या वर्षात राशिद खान करू शकतो ‘हा’ मोठा विक्रम

अफगानिस्तानचा आघाडीचा फिरकीपटू राशिद खान एका मोठ्या विक्रमापासून काही विकेटच दूर आहे. नुकत्याच झालेल्या बिग बॅश लीगच्या पहिल्या सामन्यात एडिलेड स्ट्राइकर्सकडून खेळताना राशिदने तीन विकेट घेतल्या. या विकेट बरोबरच राशिद खानने या वर्षी टी-20 मध्ये 92 विकेट घेतल्या आहेत व तो एका मोठ्या विक्रमापासून फक्त 8 विकेटच दूर आहे.

राशिद खान यावर्षी टी-20 मध्ये एका वर्षात सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे. जर राशिद खानने हे वर्ष समाप्त होण्याच्या आधी 8 विकेटस घेतल्या तर एका वर्षात टी20 मध्ये 100 विकेट घेणारा तो पहिला खेळाडू ठरेल.

दरम्यान, एका वर्षात टी20 मध्ये सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम वेस्ट इंडिजच्या ड्वेन ब्रावोच्या नावावर आहे. ब्रावोने 2016 मध्ये 72 सामन्यात 87 विकेट घेतल्या होत्या. राशिद खानने 2017 मध्ये 56 सामन्यात 80 विकेट घेतल्या होत्या.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)