राफेल हा आजवरचा सर्वात मोठा संरक्षण घोटाळा : कॉंग्रेस

संग्रहित छायाचित्र...

कॉंग्रेसकडूनही देशभर पत्रकार परिषदांचे सत्र

अहमदाबाद: राफेल प्रकरणात भाजपने 70 शहरांमध्ये पत्रकार परिषदा घेऊन आक्रमक भूमिका घेतली होती त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी आता कॉंग्रेसही मैदानात उतरली असून त्यांचे नेतेही आता देशाच्या विविध भागात जाऊन राफेलवर पत्रकार परिषदा घेत आहे. मोदींच्या गुजरातमध्ये जाऊन पत्रकार परिषद घेण्याची जबाबदारी पक्षाने ज्येष्ठ नेते मोहन प्रकाश यांच्यावर सोपवली होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या संबंधात पत्रकारांशी बोलतान मोहन प्रकाश म्हणाले की राफेल खरेदीतील घोटाळा हा देशातील संरक्षण खरेदीक्षेत्रातील आजवरचा सर्वात मोठा घोटाळा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारने सर्वोच्च न्यायालयाला या प्रकरणात खोटी माहिती देऊन न्यायालयाचीच दिशाभुल केली आहे. एवढेच नाही तर त्यांनी संसदेचाही या प्रकरणात हक्कभंग केला आहे.

मोदींना सत्याची चाड असेल तर या प्रकरणात जेपीसी नेमून चौकशी करावी अशी मागणीही त्यांनी केली. मोदींच्या या व्यवहारामुळे केवळ देशाच्या तिजोरीचेच नुकसान झालेले नाही तर देशाच्या सुरक्षेशीही तडजोड झाली आहे. असा आरोप करतानाच त्यांनी गुजरातमधील मोदींच्या काळात झालेल्या जीएसपीसी घोटाळ्याच्याही चौकशीची मागणी केली


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)