आजारी पतीस बरे करण्याच्या आमिषाने महिलेवर बलात्कार; खराडीतील घटना

पुणे : आजारी असलेल्या पतीस बरे करतो असे आमिष दाखवून घरी जात विवाहित महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी एका आरोपीस पोलिसांनी अटक केली. गत चार वर्षापासून हा प्रकार सुरू होता. आरोपीने घटनेची चित्रफित काढून ती लोकांना दाखविण्याच्या भिती दाखविली तसेच  पिडित महिलेसह इतर साक्षीदारांकडून दागिने आणि रोख स्वरूपात १ कोटी ८ लाखांची रक्कम उकळल्याचा आरोपी तक्रारीत करण्यात आला आहे.

अनिकेत फराटे (वय २९,रा. चंदननगर खराडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरोधात खराडीतील ४२ वर्षिय महिलेने फिर्याद दिली आहे. आरोपीविरोधात बलात्कार करणे, आयटी अ‍ॅक्ट तसेच जादुटोणा प्रतिबंध अधिनियम २०१३ अंतर्गत चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेची पती आजारी होते. सुमारे चार वर्षापूर्वी डिसेंबर २०१४ मध्ये फिर्यादी महिलेची परिसरात राहणाºया अनिकेत फराटेसोबत ओळख झाली. त्याने माझ्याकडे दैवी शक्ती असून त्याव्दारे  तुमच्या आजारी पतीला बरे करतो असे आमिष दाखविले. त्यानंतर  महिलेच्या घरी जावून तीच्यावर बळजबरीने बलात्कार केला. या घटनेचे त्याने चित्रफित काढली. तसेच सदर चित्रफित लोकांना दाखविण्याची भिती दाखवून त्यानंतर वारंवार बलात्कार केले.

आरोपीने फिर्यादी महिलेकडून १५ तसेच इतर साक्षीदारांकडून ९३ लाख रूपये घेत १ कोटी ८ लाख रूपयांची फसवणूक केली आहे असे पोलीस ठाण्यात दिलेल्या  फिर्यादीत नमूद केले आहे. याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे सत्यवान पाटील हे करीत आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)