नागपुरात दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार

नागपूर – नागपुरमध्ये दोन अल्पवयीन मुलींवर झालेल्या बलात्काराच्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. हा धक्‍कादायक प्रकार लकडगंज परिसरात घडला. दोन्ही पीडित मुलींना अत्यवस्थ अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक केलेली नाही.

नागपूरच्या मिनिमाता नगरात राहणाऱ्या 6 आणि 4 वर्षांच्या दोन मुलींसोबत मंगळवारी संध्याकाळी बलात्कराची घटना घडली. दोन्ही मुली घराजवळच्या मैदानात खेळताना घरापासून काही अंतरावर पोहोचल्या होत्या. संध्याकाळी साडे सातच्या सुमारास एका अज्ञात इसमाने दोन्ही मुलींना घरी सोडतो असे सांगून सोबत नेले. परंतु दोन्ही मुलींना घरी न सोडता तो ओल्ड भंडारा रोडवरील हल्दीराम फॅक्‍टरीच्या मागे असलेल्या झुडुपांमध्ये घेऊन गेला. तिथे त्या नराधमाने दोन्ही मुलींना चाकूचा धाक दाखवून त्यांच्यावर बलात्कार केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

बलात्कारानंतर आरोपीने दोन्ही मुलींना तिथेच अंधारात सोडून दिले. काही वेळाने परिसरातील नागरिकांच्या मदतीने दोन्ही पिडीत मुलींना त्यांच्या घरी सोडण्यात आले. मुलींच्या पालकांनी दोघींना लगेच सरकारी रुग्णालयात दाखल केले. दोघींवर नागपूरच्या मेयो या सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहे.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी गुन्हा नोंद करत आरोपीचा शोध सुरु केला आहे. या प्रकरणी चार वरिष्ठ पोलीस अधिका-यांच्या पथकाची नियुक्‍ती करण्यात आली आहे, अशी माहिती नागपुरचे पोलीस आयुक्‍त बी. के. उपाध्याय यांनी दिली.

उपाध्याय म्हणाले, या प्रकरणी संशयितांची ओळख पटविण्यात येत असून त्या दिशेने तपास सुरू आहे. तसेच सर्व पोलीस ठाण्यांना विशेष निर्देश देण्यात आले आहेत. याशिवाय “भरोसा’ सेलचीही मदत घेण्यात येत आहे. या गुन्ह्यामधील आरोपीला लवकरात लवकर जेरबंद करून कठोर शिक्षा देण्यासाठीची कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)