‘पाकिस्तानने आपले 40 अतिरेकी मारले’, दानवेंची जीभ पुन्हा घसरली

सोलापूर – आपल्या गावरान बोली भाषेमुळे नेहमी वादात आणि चर्चेत राहणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि जालन्याचे खासदार रावसाहेब दानवे यांची जीभ पुन्हा एकदा घसरली आहे. सोलापुरातील भाजप-शिवसेना युतीच्या विजय संकल्प मेळाव्यात बोलताना रावसाहेब दानवे यांनी भारतावर झालेल्या पुलवामा येथील भ्याड दहशतवादी हल्ल्याचा संदर्भ देताना जवानांऐवजी अतिरेकी असा उल्लेख केला.

दानवे म्हणाले की, ‘पाकिस्तानने आपले 40 अतिरेकी मारले. त्यामुळे देशात प्रचंड रोष तयार झाला.’ या वक्तव्यामुळे आता दानवे यांच्यावर सोशल माध्यमावर विरोधी पक्षासह अनेकांनी टीका केली आहे.

या वक्तव्यांचा राष्ट्रवादीने देखील समाचार घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने रावसाहेब दानवे यांच्यावर टीका करताना म्हटले आहे की, “हेच का भाजपाचे बेगडी देशप्रेम ?”…. ‘देशासाठी प्राणार्पण करणाऱ्या वीर जवानांनाच भाजपा प्रदेशाध्यक्षांनी ठरवले अतिरेकी’.

https://youtu.be/CxR0DmbWI38

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)