रणवीरची भावनिक पोस्ट

बॉलीवूडमधील हॉट कपल म्हणून प्रसिद्ध असलेल्या दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग हे गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात शाहीसोहळा देत विवाहबंधनात आडकले. हे जोडपे कोणत्या ना कोणत्या कारणाने सतत चर्चेत आहे. रणवीर लग्नानंतर प्रत्येक ठिकाणी दीपिकाचे कौतुक करणे विसरलेला नाही. आता हे जोडपे आणखी एका गोष्टीमुळे कपल चर्चेत आले आहे. आता 3 महिन्यांचा कालावधी त्यांच्या लग्नाला उलटला आहे. रणवीरने दीपिकासाठी लग्नाच्या 3 महिन्यानंतर एक भावनिक पोस्ट लिहिली आहे.

आपल्या वाढदिवशी दीपिकाने तिची वेबसाईट लॉन्च केली होती. रणवीर सिंगचा या वेबसाईटवरचा संदेश सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. त्याने या पोस्टमध्ये दीपिकाचे भरभरुन कौतुक केले आहे.

त्याने या पोस्टमध्ये, दीपिका अतिशय चांगली व्यक्ती असून आता ती माझी अर्धांग्नी आहे, म्हणून मी हे सर्व नाही लिहित आहे. पण मी तिला वैयक्तिक आणि प्रोफेशनल लाईफमध्ये खूप चांगल्याप्रकारे ओळखतो. मी जगातील सर्वाधिक नशिबवान पती आहे. तिने मला चांगला पुरूष बनण्यासाठी प्रेरित केले. ती माझ्या आयुष्याचा प्रकाश आहे, असल्याचे म्हटले आहे. सध्या सोशल मीडियावर रणवीरची ही पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टवर चाहत्यांनी भरभरुन कमेंट्‌स दिल्या आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
2 :thumbsup:
9 :heart:
0 :joy:
32 :heart_eyes:
3 :blush:
0 :cry:
1 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)