रणवीर सिंहच्या ‘सिम्बा’चा ट्रेलर रिलीज  

दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह यांचा विवाहसोहळा चांगलाच चर्चेत आहे. यानंतर आता रणवीर सिंहच्या आगामी ‘सिम्बा’ चित्रपटाचा ट्रेलर आज रिलीज झाला आहे. या ट्रेलरच्या सुरुवातीला सिंघम चित्रपटातील अजय देवगणचेही काही सीन्स दिसत आहेत. सिम्बा चित्रपटाचे दिग्दर्शन रोहित शेट्टीने केले असून या चित्रपटात रणवीर सिंहसह सारा अली खान आणि सोनू सूदही मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. सारा अली खानचा केदारनाथनंतर सिम्बा हा दुसरा चित्रपट असणार आहे.

-Ads-

‘सिम्बा’ हा दक्षिणेतील स्टार ज्युनिअर एनटीआर यांच्या ‘टेम्पर’चा हिंदी रिमेक आहे. यामध्ये रणबीर एक भ्रष्ट पोलिस अधिकारी एका सुंदर मुलीच्या प्रेमात पडल्यावर खूप बदलून जातो, अशी याची कथा आहे. दरम्यान 28 डिसेंबर रोजी सिम्बा चित्रपट रिलीज होणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
1 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)