“अंदाज अपना अपना’च्या सीक्‍वलमध्ये रणवीर सिंह

बॉलीवूडमधील सूपरस्टार अभिनेता रणवीर सिंह याने आपल्या आतापर्यंतच्या कारर्किदीत रोमॉंटिकपासून ऍक्‍शन आणि निगेटिव्ह भूमिकाही साकारल्या आहेत. आता त्याची कॉमिडी चित्रपट करण्याची इच्छा आहे. कॉमिडी जॉनरमध्येही तो सर्वात अगोदर “अंदाज अपना अपना’च्या सीक्‍वलमध्ये काम करू इच्छित आहे. याला स्वतः रणवीर सिंहने दुजोरा दिला आहे.

रणवीर सध्या त्याच्या आगामी “सिंबा’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. या प्रमोशनसाठी त्याने आपल्या चाहत्यांसाठी ट्‌विटरवर #AskSimmba नावाने अभियान सुरू केले आहे. यात एका ट्‌विटर युझरने रणवीरला प्रश्‍न विचारल होता की, तु कॉमिडी चित्रपट करू इच्छितो का?

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

याला उत्तर देताना रणवीर म्हणाला, “मला वाटते की, मला एखादा जबरदस्त आणि जानदार कॉमिडी चित्रपट मिळावा. बहुतेक “अंदाज अपना अपना 2?’. या ट्‌वीटवरून स्पष्ट होते की, तो “अंदाज अपना अपना’च्या सिक्‍वलमध्ये काम करू इच्छितो.

दरम्यान, या चित्रपटाच्या सीक्‍वलची सर्वांनाच प्रतिक्षा असून अद्याप त्याची अनाउंसमेंट होणे बाकी आहे. मात्र, या चित्रपटाची घोषणा होताच यात रणवीर सिंह कोणती भूमिका साकारतो याची प्रेक्षकांना उत्सुकता निर्माण झाली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)