बाॅलीवूडमध्ये रणवीर सिंग ला झाले 8 वर्षे

करियरबदल सांगितली काही गुपितं

अभिनेता रवणीर सिंग ला बाॅलीवूडमध्ये पदार्पण करून आठ वर्षे पूर्ण झाली आहेत. या आठ वर्षाच्या लांबच्या प्रवासात ‘गोलियों की रासलीला-राम-लीला’, ‘बाजीराव मस्तानी’ आणि ‘पद्मावत’ सारखे ब्लाॅकबस्टर चित्रपट करून खूप मोठ यश आणि प्रसिध्दी मिळविली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

रणवीर एका मुलाखती दरम्यान सांगतो की, ‘हे सारे यश, प्रसिध्दी सहजासहजी मिळत नाही, त्यासाठी खूप काही गमवावे लागते’. रणवीर ने 2010 मध्ये बैंड बाजा बारात या हिट चित्रपटाव्दारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. यानंतर त्याने लेडीज वर्सेज रिकी बहल, लुटेरा, आणि दिल धडकने दो या सारखे अनेक हिट चित्रपट केले.

रणवीर सांगतो की, मी खूपच नशीबवान आहे की, मला ज्या क्षेत्राची आवड होती, त्याच क्षेत्रात मी काम करत आहे. मला माझ्या आयुष्याबदल तसेच इतराबदल काहीच तक्रार नाही आहे. मी माझ्या क्षेत्रात खूप चांगल काम करत आहे. माझे सर्व निर्मात्यासोबत चांगले नातेसंबंध आहे, मी त्याच्यासोबत काम करत आहे.

पुढे रणवीर सांगतो की, तुम्हाला जीवनात काही गोष्टीशी तडजोड करावी लागते, जसे की तुमची वेळ, तुमची प्रायव्हसी. प्रामाणिकपणा बदल मी तक्रार केलेली तुम्हाला कधीच दिसणार नाही.

एवढे यश, प्रसिध्दी मिळूनही अजूनही पाय जमिनीवर आहेत, याबदल बोलताना रणवीर म्हणतो की, माझ्याजवळ नशिबाने खूप मजबूत असे सहकारी मित्र, माझे आई-वडील, परिवार आहे. त्यांनी माझ्या जीवनात अनेक चढ-उतार पाहिले आहेत. ते जेव्हा माझ्याशी बोलतात तेव्हा ते एका व्यक्तिसोबत बोलत असतात. एका स्टार अभिनेत्यांशी नाही. मी खूपच नशीबवान आहे की माझ्याजवळ अशी लोक आहेत. प्रसिध्दी ही कायमस्वरूपी नसते.

रणवीर सांगतो की, आपण आज आहोत तर उद्या नाही. त्यामुळे प्रत्येक क्षणाचा आनंद घेता आला पाहिजे, आणि सतत कष्ट करत राहिलं पाहिजे. रणवीरचे किल दिल गुंडे बेफिकरे असे काही चित्रपट अयशस्वी ठरले. त्याबदल रणवीर सांगतो की, यश आणि अपयश येतच असत. ते स्विकारून काम कराव लागत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)