रणवीर-रणबीर लवकरच येणार एकत्रित

अभिनेता रणवीर सिंह याचा “सिंबा’ चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनवेळी रणवीर यानं 90च्या दशकातील “अंदाज अपना अपना’ या कॉमेडी चित्रपटाच्या रिमेकमध्ये काम करण्याची इच्छा व्यक्‍त केली होती. त्यानंतर आता या चित्रपटाशी संबंधीत आणखी एक धमाकेदार वृत्त समोर आले आहे.

या कॉमेडी ड्रामा चित्रपटाचा सीक्‍वल बनविण्याचे प्लानिंगही चित्रपट निर्माता रोहित शेट्टीने सुरू केले आहे. या चित्रपटाबाबत रोहित शेट्टी म्हणाला, हा एक कल्ट चित्रपट असल्याने त्याची निर्मिती करणे जरा अवघड आहे. जर तुम्ही “अंदाज अपना अपना’चा सीक्‍वल बनविण्याचा विचार करत असला, तर ते एक आव्हान असेल. कारण हा चित्रपट टाइमलेस आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यासाठी मी रणबीर कपूरसोबत हाथ मिळवू इच्छित आहे. कारण तो माझा फेवरेट ऍक्‍टर आहे. आगामी काही दिवसांत सर्व गोष्टी निश्‍चित करण्यात येतील. तसेच रणबीर कपूर सोबत काम करण्याचा चांगला अनुभव मिळेल, असे रोहित म्हणाला.
या चित्रपटासाठी जर रणबीर कपूरने होकार दर्शविला तर त्याच्या चाहत्यांसाठी ते “सोन्याहून पिवळे’ ठरेल. दरम्यान, रोहितच्या या वक्‍तव्यानंतर सर्व चाहत्यांना रणवीर आणि रणबीर या जोडीला पडद्यावर एकत्रित पाहण्यासाठीची उत्सुकता वाढली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)