अखेर रणजितसिंह मोहिते-पाटील यांचा अधिकृतपणे भाजपात पक्षप्रवेश

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे पश्चिम महाराष्ट्रातील दिग्गज नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांचे सुपुत्र रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी हाती भाजपचा झेंडा घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवें यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.

रणजितसिंह मोहिते पाटील यांनी मंगळवारी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात भाजप प्रवेशाची घोषणा केली होती. त्यानंतर आज मुंबईत हाती कमळ घेऊन रणजितसिंह यांनी भाजपात अधिकृतपणे प्रवेश केला. यावेळी रणजितसिंह मोहिते पाटील यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं भरभरून कौतुक केलं. त्याचवेळी रणजितसिंह यांनी आपण भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचं जाहीर केलं.

रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या पक्षप्रवेशानंतर माढ्यातील लोकसभा जागा त्यांना दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियम येथील गरवारे हॉल येथे रणजितसिहं यांचा भाजप प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)