सुजय विखेंपाठोपाठ रणजितसिंह मोहिते पाटीलही भाजपमध्ये ?

मुंबई – नगरमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभाचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र डॉ. सुजय विखे यांनी आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यानंतर काही वेळातच राष्ट्रवादीचे खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांचे सुपुत्र रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजप नेते आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली आहे. त्यामुळे सुजय विखेंनंतर आता रणजितसिंह मोहितेही भाजपात प्रवेश करणार का ? याबाबतच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत.

रणजितसिंह मोहिते हे गिरीश महाजन यांच्या बंगल्यावर दाखल झाले असून त्यानंतर ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर येत आहे.

-Ads-

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माढ्यातून माघार घेतली असली तरी विजयसिंह मोहिते पाटील यांची उमेदवारी अद्याप जाहीर केलेली नाही. शिवाय त्याठिकाणी राष्ट्रवादीकडून माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांचे नावही चर्चेत आहे. तर रणजित सिंह हे माढा लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत.

दरम्यान, मी वैयक्तिक कामासाठी गिरीश महाजन यांची भेट घेतली आहे, असा दावा रणजितसिंह मोहिते पाटलांनी केला आहे.

What is your reaction?
2 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)