रणजितसिंह मोहिते पाटलांचा भाजप प्रवेश निश्चित?, राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का

मुंबई – डॉ. सुजय विखे – पाटील यांच्या भाजप प्रवेशानं काँग्रेसला मोठा धक्का बसला होता. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसला देखील मोठा धक्का बसणार आहे. रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या भाजपप्रवेशावर शिक्कामोर्तब होणार आहे. उद्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत रणजितसिंह मोहिते-पाटील भाजपात प्रवेश करणार हे जवळपास निश्चित असल्याची माहिती मिळत आहे.

राष्ट्रवादीकडून विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटलांची उमेदवारी जाहीर न झाल्याने मोहिते पाटील गट नाराज आहे. यासाठीच आज अकलूजमधील शिवरत्न बंगल्यावर आज निर्णायक बैठक होणार आहे. या बैठकीत याबाबतचा निर्णय होऊ शकतो. रणजितसिंह मोहिते पाटलांना भाजप उमेदवारी देण्यास तयार आहे. भाजप प्रवेशापूर्वी समर्थकांशी चर्चा करण्यासाठी आज मोहिते पाटलांनी बैठक बोलावली आहे.

दरम्यान, आज भाजपाच्या नव्या आधुनिक मीडिया रूमच्या उद्घाटन सोहळ्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वच पक्षांमधले मोठे नेते भाजपमध्ये येण्यास उत्सुक असल्याचं सूचक विधान केले आहे. त्यामुळे सुजय विखे-पाटील, रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यानंतर आणखी कोण कोण भाजपात प्रवेश करणार अशी चर्चा सर्वसामन्यासह राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)