रणजितसिंह यांचा भाजप प्रवेश

मुंबई – सातारा जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. “बारामतीशी आमचा थेट संघर्ष झाला, असे म्हणत रणजितसिंह यांनी भाजप प्रवेशावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसवर जोरदार टीका केली आहे.

रणजितसिंह म्हणाले, माढा मतदार संघात ज्या हालचाली होत आहेत त्यात लढवय्याची भूमिका माझी होती. कृष्णा खोऱ्याच्या स्थापणेनंतर पाणी आमच्या सीमारेषापर्यंत आले आहे. पण बारामतीकरांची इच्छा नव्हती म्हणून आमच्याकडे रेल्वे धावली नाही, असा हल्लाबोल त्यांनी केला आहे. माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारी भाजपकडून रणजितिसंह नाईक निंबाळकरांना देण्यात येण्याची शक्‍यता आहे. रणजितसिंह यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने राष्ट्रवादीला मोठा धक्का दिल्याची चर्चा सुरू झाली. भाजपचं पारडं जड होताना दिसताच शरद पवारांनी पुन्हा एकदा जोरदारी हालचाली करत माढ्याचा उमेदवार निश्‍चित केला आणि पुन्हा एकदा पारडं फिरताना दिसत आहे.

शरद पवारांनी डाव टाकत माढ्यातून संजय शिंदे यांना उमेदवारी दिली. त्यानंतर भाजपकडून रणजितसिंह यांच्याऐवजी रोहन देशमुख यांचा उमेदारीसाठी विचार केला जात असल्याची चर्चा होती. पण त्यानंतर भाजपमध्ये प्रवेश केलेलल्या रणजितसिंह नाईक-निंबाळकर याचे नाव चर्चेत आले आहे.

1 COMMENT

  1. राष्ट्रवादी ला जबर धक्का…. हसून हसून पोट दुखायला लागलं… रणजी
    त निंबाळकर यांना कॉंग्रेस मध्ये कोण ओळखत नव्हते…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)