रणजी करंडक : पहिल्या दिवसअखेर महाराष्ट्र 3 बाद 298

पुणे – सलामीवीर एस.एम.गुगळे याची शतकी खेळी आणि खुराणाच्या 71 धावाच्या जोरावर रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाने आज पहिल्या दिवसअखेर 3 बाद 298 धावा केल्या आहेत. महाराष्ट्र संघाकडून एस.एम गुगळे याने 15 चौकारासह 191 चेडूंत 101 धावा केल्या. तर खुराणा याने 12 चौकारासह 71 धावा केल्या.

-Ads-

रणजी करंडक स्पर्धेत महाराष्ट्र आणि मुंबई यांच्यातील कसोटी सामन्यास आज पुण्यातील गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर सुरूवात झाली आहे. मुंबई संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. आज पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा महाराष्ट्राच्या 3 बाद 298 धावा झाल्या असून सध्या खेळपट्टीवर जे.एस.पांडे हा 68 तर आर.ए. त्रिपाटी हा 25 धावावर खेळत होते. मुंबईच्या संघाकडून गोलंदाजीत शुभम रांजणे याने 2 तर शिवम दुबेने 1 गडी बाद केला आहे.

दोन्ही संघाना अद्याप स्पर्धेत प्रत्येकी तीन लढतीनंतरही विजय मिळवता आलेला नाही.त्यामुळे घरच्या मैदानावर खेळणाऱ्या महाराष्ट्राला संघर्ष करत असलेल्या मुंबईवर वर्चस्व राखण्याची संधी आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)