रणजी करंडक : दुसऱ्या दिवसअखेर मुंबई 5 बाद 196

पुणे – रणजी करंडक स्पर्धेत महाराष्ट्र आणि मुंबई यांच्यातील कसोटी सामन्यात दुसऱ्या दिवसअखेर मुंबई संघाने 5 बाद 196 धावापर्यंत मजल मारली आहे. मुंबईचा संघ अजूनही महाराष्ट्राच्या पहिल्या डावातील धावसंख्येच्या 156 धावांनी पिछाडीवर आहे.

कालच्या 3 बाद 298 धावसंख्येवरून पुढे खेळताना जे.एस. पांडे हा 74 तर आर.ए. त्रिपाठी हा 40 धावा काढून बाद झाला. त्यानंतर एन.एस. शेख हा फलंदाजही 23 धावा काढून बाद झाल्यानंतर तळाचे फलंदाज झटपट बाद झाल्याने कालच्या धावसंख्येत महाराष्ट्राला केवळ 54 धावांची भर घालता आली. मुबंई संघाकडून आकाशने सर्वाधिक 4 तर शुभम राजंणे आणि रोस्टन डायस याने प्रत्येकी 2 गडी बाद केले. शिवम दुबेने एक गडी बाद केला.

-Ads-

पहिल्या डावाची सुरूवात करताना मुबंईचा सलामीवीर जय बिस्टा हा 27 धावांवर बाद झाल्यानंतर आदित्य तारे आणि सिध्देश लाड यांनी मुंबईचा डाव सावरला. दोघांमध्ये दुसऱ्या विकेटसाठी 109 धावांची भागिदारी झाली. आदित्य तारे हा 63 धावांवर बाद झाला. त्यांनतर सुर्या (12), आरमान जाफर (06) आणि शिवम दुबे (04) झटपट बाद झाले. महाराष्ट्र संघाकडून पालकरने 2 तर सत्यजित बच्छाव, चिराग खुराणा आणि समद फल्ला यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा मुंबईची धावसंख्या 5 बाद 196 झाली असून खेळपट्टीवर कर्णधार सिध्देश लाड हा नाबाद 70 तर शुभम रांजणे हा नाबाद 9 धावांवर खेळत होते. तिसऱ्या दिवशी मुंबईच्या उर्वरीत पाच फलंदाजाना झटपट बाद करून एक चांगली आघाडी घेण्याची  महाराष्ट्र संघाला संधी आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)