आपल्या शेवटच्या खेळीत गंभीरने ठोकले शतक; प्रेक्षक झाले भावूक

नवी दिल्ली – क्रिकेट जगतातून निवृत्तीची घोषणा केलेल्या गौतम गंभीरने आपल्या घरच्या मैदानावर अखेरच्या खेळीदरम्यान शतक केले. दिल्ली आणि आंध्र प्रदेश यांच्यात सुरू असलेल्या रणजी सामन्यात गौतम गंभीरने रणजी करंडक स्पर्धेत 42 वे शतक पूर्ण केले.

आज सकाळी गंभीर जेव्हा दिल्लीकडून फलंदाजीसाठी मैदानात उतरला तेव्हा खेळाडूंनी त्याला ‘गार्ड ऑफ ऑनर’ दिला. गंभीरने जेव्हा खेळपट्टीवर पाऊल ठेवले तेव्हा फिरोजशाह कोटलावरील उपस्थित प्रेक्षकांनी त्याचे टाळ्या वाजवून स्वागत केले. काल दिवसअखेर गंभीरने 154 चेंडूत  नाबाद 92 धाव करत दिल्लीला मजबूत स्थितीत पोहचवले होते. त्यानंतर आज तिसऱ्या दिवशी पुढे खेळताना गौतम गंभीरने आपले शतक पूर्ण केले. गौतमने 185 चेंडूत 10 चौकाराच्या मदतीने 112 धावा करत झेलबाद झाला.

-Ads-

दरम्यान गौतम गंभीर याने बुधवारी (5 डिसेंबर) सर्व प्रकारच्या क्रिकेट प्रकारातून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली होती. गंभीरने म्हटले होते की, आंध्र प्रदेश विरूध्दचा रणजी सामना हा त्याचा अखेरचा क्रिकेट सामना असेल. 37 वर्षीय गंभीरने  58 कसोटी. 147 एकदिवसीय आणि 37 टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने  खेळले आहेत.

गंभीरने 58 कसोटी सामन्यात 41.96 च्या सरासरीने 4154 धावा केल्या आहेत. यात 9 शतकांचा समावेश आहे. तर एकूण 147 एकदिवसीय सामने खेळले असून त्याने 39.7 च्या सरासरीने 6144 धावा केल्या आहेत. यामध्ये 11 शतक व 34 अर्धशतकांचा समावेश आहे. नाबाद 150 ही त्याची एकदिवसीय सामन्यातील सर्वोच्च खेळी आहे.  एकदिवसीय आणि कसोटी सामन्याबरोबरच गौतम गंभीर याने 37 टी20 सामने देखील खेळले आहेत. यामध्ये त्याने एकूण 932 धावा केल्या असून 7 अर्धशतके केली आहेत.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)