रणजितसिंह ना.निंबाळकर यांचा वाढदिवस उत्साहात 

विविध उपक्रमांचे आयोजन रणजितदादांवर शुभेच्छांचा वर्षाव

फलटण – सातारा जिल्हा राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष व कृष्णा खोरे महामंडळाचे माजी उपाध्यक्ष रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांचा वाढदिवस विविध उपक्रमांद्वारे उत्साहात साजरा करण्यात आला. वाढदिवशी सकाळी रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांचे औक्षण त्यांच्या सुविद्य पत्नी जि. प. सदस्या ऍड. जिजामाला नाईक-निंबाळकर यांनी केले. त्यानंतर छ. शिवरायांच्या पुतळ्याला त्यांनी अभिवादन केले. स्वराज दूध प्रकल्पावर तेथील कर्मचाऱ्यांच्या वतीने रणजित नाईक-निंबाळकर यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

यानंतर फलटण येथे त्यांचे वडील प्रदेश कॉंग्रेसचे उपाध्यक्ष माजी खा. हिंदुराव नाईक-निंबाळकर, आई मंदाकिनी नाईक-निंबाळकर, भाऊ समशेरसिंह यांचे त्यांनी आशीर्वाद घेतले. वाढदिवशी रणजितसिंह यांना शुभेच्छा देण्यासाठी पुष्पगुच्छ, भेटवस्तू न आणता गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य भेट म्हणून देण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार हजारो वह्या जमा झाल्या. त्या गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात आल्या.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, फलटण उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळेवाटप, शहरातील विविध विकास कामांची भूमिपूजने करण्यात आली. त्यामध्ये प्रभाग 3 मधील रस्ता खडीकरण, डांबरीकरण, समाजमंदिर नूतनीकरणाचा शुभारंभ, स्मशानभूमी सुशोभिकरण शुभारंभ, प्रभाग 11 मधील रस्ता कॉंक्रीटीकरण शुभारंभ, स्वामी विवेकानंदनगर येथील पिण्याच्या पाणी पुरवठा पाईप लाईन कामाचा शुभारंभ, कॉलेज रोड येथे पेव्हींग ब्लॉक बसविणे शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर स्वराज दुध प्रकल्पातील कर्मचाऱ्यांच्यावतीने निंभोरे येथील आश्रम शाळेत शालेय साहित्य व खाऊवाटप करण्यात आले. श्रीमती प्रेमलाताई चव्हाण हायस्कूल, मलठण येथे राष्ट्रीय कॉंग्रेस विद्यार्थी संघटनेच्या रक्तदान शिबीर उदघाटन, रामभाऊ शेंडे मित्रमंडळाच्यावतीने मोफत रिक्षा योजना लोकार्पण करण्यात आले. तेथे त्यांनी शहर व तालुक्‍यातील लोकांच्या शुभेच्छा स्विकारल्या.

वाठार निंबाळकर येथे ऍड. सौ. जिजामाला नाईक-निंबाळकर यांच्या फंडातील विकासकामांची भूमिपूजने तसेच वाखरी येथे आ.आर.जी.रुपनवर यांच्या फंडातून 10 लाख निधीचे सभा मंडप भूमीपूजन करण्यात आले. सायंकाळी 5.30 ते 7.30 लोकनेते हिंदुराव नाईक-निंबाळकर साखर कारखाना कार्यस्थळावर ग्रामस्थांच्या शुभेच्छा स्वीकारल्या. रात्री कोळकी येथे कुस्तीमैदान आयोजित केले होते.

वाढदिवसानिमित्त रणजितसिंह यांना प्रत्यक्ष व दूरध्वनीद्वारे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण, प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण, खा. उदयनराजे भोसले, खा. विजयसिंह मोहिते-पाटील, माजी खा. रणजितसिंह मोहिते-पाटील, आ. शिवेंद्रराजे भोसले, आ. जयकुमार गोरे, आ. आनंदराव पाटील, माजी आ. मदन भोसले, जयकुमार शिंदे, पाचगणीच्या नगराध्यक्षा लक्ष्मीताई कऱ्हाडकर, शिवसेना माजी जिल्हा प्रमुख नरेंद्र पाटील, जिल्हा कॉंग्रेसचे उपाध्यक्ष बाळासाहेब बागवान, शिवाजीराव फडतरे, विजयराव कणसे, जि. प. सदस्य भिमराव पाटील, सुनील पाटील, तुकाराम शिंदे, अशोकराव जाधव, विवेक देशमुख, हेमंत जाधव, रोहिदास पिसाळ, कॉंग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस रजनीताई पवार, जिल्हाध्यक्षा धनश्री महाडिक, विराज शिंदे, नानासो इवरे, अमीत रणवरे, चंद्रसेन कदम, झाकीर पठाण, आदिल मोमिन, शिवराज मोरे, नगरसेवक सचिन अहिवळे, सचिन बेडके, सूर्यवंशी, महेंद्र बेडके, डॉ. प्रविण आगवणे, नगरसेविका मदलसा कुंभार, ज्योती खरात, रश्‍मी नाईक-निंबाळकर, मीना नेवसे, ऋषिकेश निंबाळकर, अरुण खरात, रणजितदादा मोटर वाहतूक संस्थेचे चेअरमन अशोकराव भोसले, धनंजय आटोळे, अभिजीत निंबाळकर, शरद दीक्षीत, डॉ. सुभाष गुळवे, विष्णू लोखंडे, संतोष गावडे, विजय घनवट, अजित गायकवाड, कदम सर, सिराज शेख, अमित कदम, नंदिनी सावंत, शहराध्यक्षा स्वीटी शहा, बबलु कदम, अनिकेत कदम, रोहीत झांजुर्णे, सुरज तांदळे, आदिनी शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)