‘मर्दानी- 2’ सिनेमाचा फर्स्ट लुक रिलीज, राणी मुखर्जी पुन्हा पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत

बॉलिवूडमध्ये जुन्या हिट सिनेमांचे सिक्‍वेल बनवण्याची प्रथा रुढ आहे. बऱ्याच वेळा अशा हिट सिनेमांचे सिक्‍वेल बॉक्‍स ऑफिसवर फ्लॉप झाल्याचेही बघायला मिळाले आहे. पण पोलिस आणि क्राईम स्टोरी असलेल्या सिनेमांच्या बाबतीत असे क्‍वचितच घडताना दिसते. अश्या ऍक्‍शन सिनेमांच्या सिक्‍वेलची प्रेक्षक  अगदी आतुरतेने वाट बघत असतात. ‘सिंघम आणि दबंग’ ही त्यापैकीच काही चांगली उदाहरणे आहेत.

आता पोलिस ऑफिसरच्या रोलमधील राणी मुखर्जीच्या ‘मर्दानी’चा सिक्‍वेलही याच रांगेत उभा असून, ‘मर्दानी- 2’ असं या सिनेमाचं नाव आहे. सध्या मर्दानी- 2 या सिनेमाचं पहिल्या टप्यातील शूटिंग पूर्ण झालं असून, आता दुसऱ्या टप्यातील शूटिंगला सुरवात होणार आहे.

या दरम्यान, चित्रपटातील राणी मुखर्जीच्या पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेतील फर्स्ट लुक समोर आला आहे. या लुक मध्ये राणी खूपच रुबाबदार आणि डॅशिंग दिसत असून, ती एसपी शिवानी शिवाजी रॉयची भूमिका साकारत आहे. 2014 मध्ये आलेल्या ‘मर्दानी’ मध्ये राणी याच भूमिकेत दिसली होती. या चित्रपटाचं दिग्दर्शन गोपी पुरातन करत असून, निर्मिती आदित्य चोप्रा करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)