राणी मुखर्जीचा ‘हिचकी’ चीनमध्ये सुपरहिट

राणी मुखर्जी हिची प्रमुख भूमिका असलेला हिचकी चित्रपट भारतात प्रेक्षकांच्या पंसतीस उतरला होता. भारतात 23 मार्च 2018 रोजी प्रदर्शित झालेल्या चित्रपटाने भारतात 76 कोटींची कमाई केली होती.

भारतीय चित्रपटसृष्टीला चीनच्या रूपात नवीन आणि महत्त्वपूर्ण अशी मोठी बाजारपेठ मिळाली आहे. घरगुती आणि ओवरसीज बाजारात यश मिळविल्यानंतर चीनमध्ये हिंदी चित्रपट मोठया प्रमाणात प्रदर्शित होवू लागले आहे. त्याच पार्श्वभूमीवर चीनी बाॅक्स आॅफिसवर 12 आॅक्टोंबरला राणी मुखर्जीचा हिचकी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

विशेष म्हणजे ‘हिचकी’ हा चित्रपट भारतापेक्षा चीनमध्ये लोकांच्या जास्त पसंतीस उतरला आहे. भारतात या चित्रपटांने 76 कोटीची कमाई केली होती. मात्र भारताच्या तुलनेत या चित्रपटाने चीनच्या बाॅक्स आॅफिसवर 103 कोटींची कमाई केली आहे. चीन व्यतिरिक्त हा चित्रपट रशियन भाषेत डब करण्यात आला असून रशियातही प्रदर्शित होणार आहे.

चांगल्या चित्रपटाला भाषेचं बंधन नसतं. भारतातीलच नाही तर जगभरातील प्रेक्षकांच्या पंसतीस ही कथा उतरत असल्याने राणी मुखर्जी आंनद व्यक्त केला आहे. तिनं आपल्यासाठी ही खूपच अभिमानाची गोष्ट असल्याचे म्हटलं आहे.

चीनमध्ये राणी मुखर्जीचा बोलबाला 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)