अनुराग कश्‍यपकडून रंगोलीला प्रत्युत्तर

कंगणा रणावतची बहिण रंगोली चंदेल नेहमीच अनुराग कश्‍यपच्या विरोधात काही तरी ट्विट करत असते. मात्र अनुरागने आतापर्यंत तिला विशेष प्रत्युत्तर दिलेले नव्हते. मात्र आज अनुराग कश्‍यपने आपल्या भावनांना वाट करून दिली. रंगोलीने तापसी पन्नूला उद्देशून चक्क “सस्ती कॉपी’ असे म्हटले होते. त्यावर अनुराग कश्‍यपने तापसीचा बचाव करताना रंगोलीला सुनावले आहे. कंगणा आणि राजकुमार रावच्या “जजमेंटल है क्‍या’चा नवीन ट्रेलर दोनच दिवसांपूर्वी रिलीज झाले.

तापसी पन्नूनेही या पोस्टरचे कौतुक केले होते. त्यावर रंगोलीने तिला धन्यवाद द्यायच्या ऐवजी तिच्यावर टीकाच करायला सुरुवात केली. “काही लोक कंगणाला कॉपी करून आपले दुकान चालवतात. पण ट्रेलरचे कौतुक करताना कंगणाच्या नावाचा उल्लेखही केला नाही. तापसी सस्ती कॉपी होणे बंद कर.’ त्यावर अनुराग कश्‍यपने “तुला नक्की काय म्हणायचे आहे. मी तापसी आणि तुझ्या बहिणीबरोबरही काम केले आहे. पोस्टरचे कौतुक म्हणजे सर्वांचेच कौतुक असते, असे सुनावले. त्यावरही “तापसीने कंगणाला डबल फिल्टरची गरज आहे.

तसेच कंगणा “जहाल’ आहे, असे म्हटले होते.’ याची रंगोलीने आठवण करून दिली. एवढेच नव्हे तर सगळ्यांची पोलखोल करण्याची धमकीही दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)