‘रंगीला राजा’चे प्रदर्शन लांबणीची शक्‍यता 

दिलासा देण्यास हायकोर्टाचा नकार

मुंबई  – “रंगीला राजा’ चित्रपटातील महत्त्वाची दृश्‍य वगळल्याने सेन्सॉर बोर्डाच्या विरोधात याचिका दाखल करणाऱ्या चित्रपट निर्माते पहलाज निहलानी यांना दिलासा देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. सुटीकालीन न्यायालयाचे न्यायमूर्ती रियाझ छागला यांनी संबंधीत विषय हा द्विसदस्यीय खंडपीठाच्या अखत्यारित येत असल्याने नियमित न्यायालयापुढे जाण्याचे निर्देश दिले. तसेच सेन्सॉर बोर्डाकडे पुनर्विचार अर्ज दाखल करण्याचा सल्लाही दिला. यामुळे शुक्रवारी 16 तारखेला प्रदर्शीत होणाऱ्या “रंगीला राजा’ चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर पडण्याची शक्‍यता आहे.

अभिनेता गोविंदा याची मुख्य भूमिका असलेल्या रंगीला राजा या चित्रपटाची निहलानी यांनी निर्मीती केली असून चित्रपटात कोणतेही आक्षेपार्ह किंवा अश्‍लील दृश्‍ये नसताना सेन्सॉर र्बोर्डाने 20 दृष्ये अन्यायकारकपणे वगळली असल्याचा आरोप करत निहलानी यांनी सेन्सॉर बोर्डाच्या निर्णयाला आव्हान दिले आहे.

-Ads-

सीबीएफसीचे प्रमुख प्रसून जोशी असून राजकारणाशी ते प्रेरीत आहेत. एखाद्या चित्रपटावर सेन्सॉर बोर्ड 21 दिवसांत निर्णय घेते. आमिर खानचा “ठग्स ऑफ हिंदोस्तान’ या चित्रपटाला अवघ्या 20 दिवसात सेन्सॉर बोर्डाने परवानगी दिली. परंतु “रंगीला राजा’ चित्रपटासाठी स्क्रिनिंग कमिटीने 40 दिवस घेतल्याचा आरोप निहलानी यांनी याचिकेत केला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
1 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)