रणबीर आणि आलियावर कंगणाचा कडवट प्रहार

कंगणा रणावत तिच्या सडेतोड बोलण्याबाबत प्रसिद्ध आहे. तिने यापूर्वी करण जोहर, हृतिक रोशन आणि अन्य सेलिब्रिटीजबाबत खूपच सडेतोड वक्‍तव्ये करून वाद निर्माण केले होते. आता तिने आपला मोर्चा रणबीर कपूर आणि आलिया भटकडे वळवला आहे. एका इंटरव्ह्यूदरम्यान कंगणाने रणबीर आणि आलियावर टीकेची झोड उठवली. “काही लोक केवळ आपले वेगळेपण जपण्याचेच काम करत असतात.

अशा लोकांना देशाशी काहीही घेणेदेणे असत नाही. 37 वर्षाचा रणबीर आणि 27 वर्षाची आलिया स्वतःला यंग स्टार कसे काय म्हणवून घेऊ शकतात. माझ्या आईला तर 27 व्या वर्षी तीन मुले झाली होती.’ असे कंगणा म्हणाली. यंग स्टार म्हणवणारे हे लोक इन्स्टाग्रामवर आपल्या सेक्‍स लाईफबाबत उघडपणे बोलायलाही कमी करत नाहीत. सोशल मिडीयावर उघडपणे वाट्टेल त्याच्याबरोबर हवे तसे फोटो काढून घेतात. मात्र देशाबाबत बोलायला यांच्याकडे काहीही मत नसते. ते मात्र आपले वैयक्तिक मत आहे, असे सांगतात, अशा शब्दात कंगणाने आपला त्रागा व्यक्‍त केला. देशहिताबाबत काहीही न बोलणाऱ्यांना कंगणाने गेल्या काही दिवसांपासून सुनवायला सुरुवात केली आहे, त्याचेच हे उदाहरण आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)