राम या भूमिचाच; रामाची भूमी नव्हे

विश्‍व हिंदू परिषदेच्या हुंकार सभेमध्ये शंकर गायकर यांचे प्रतिपादन

हिंगोली, (प्रतिनिधी): रोज सोमवार दुपारी चार वाजताच्या सुमारास विश्व हिंदू परिषद यांनी घेतलेल्या हुंकार सभेच्या वेळी शंकर गायकर यांनी यावेळी या राम भूमीचा आहे. भूमी रामाची नाही. असे त्यांनी यावेळी व्यासपीठावरून म्हटले आहे.

-Ads-

विश्व हिंदू परिषदेच्या सभेला जिल्हाभरातून हजारो कार्यकर्ते उपस्थित झाले होते यावेळी जिल्हाध्यक्ष डॉक्‍टर मुरलीधर तोष्णीवाल यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. व्यासपीठावर मोठ्या संख्येने साधू संतांची उपस्थिती होती.
मराठवाडा धर्मप्रचारक मंत्री राजेंद्र हलवाई म्हणाले, “राम मंदिर बांधणे हे भारताचे प्रतीक व स्वाभिमान आहे. कॉंग्रेसच्या काळात राम मंदिर उभारले गेले नाही मग महाराष्ट्रात मराठ्यांचा वाघ बसलेला असताना त्याला जाग का आली नाही. लाखो हिंदूंच्या लोकांचे रक्त सांडले होते. मग राम मंदिर बांधण्यासाठी तारीख व तारीख का देत आहेत अशी टीकाही त्यांनी केली.

वादग्रस्त भूमीवर पूर्वी राममंदिर होते, याबाबत 9 हजार पानाचा पुरावाही कोर्टाकडे दिला आहे. 1934 चा पुरावाही दिला आहे. मग राम मंदीर का बाधले जात नाही. असेही हलवाई म्हणाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)