चिरंजीव म्हणतात आपल्या वडिलांचा प्रभाव अजून कायम

टीआरएसला 100 जागा मिळण्याचा रामराव यांचा विश्‍वास

हैदराबाद: तेलंगणातील टीआरएस पक्षाच्यानिवडणूक प्रचाराची धुरा मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांचे चिरंजीव के.टी. रामाराव हे सांभाळत आहेत. त्यांनी आज पीटीआयशी बोलताना सांगितले की राज्यात सरकारच्या विरोधात असंतोषाचे वातावरण आहे असे भासवले जात आहे. पण हे वातावरण बदलण्याची क्षमता आपले वडिल मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्यात असून ते हे वातावरण बदलून टाकतील असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला आहे. राज्यातील जनता टीआरएस पक्षाच्याच बाजूने मतदान करील आणि आम्ही 119 पैकी 100 जागा जिंकू असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला आहे.

स्वत: के टी रामाराव हे यंदा तिसऱ्यांदा सिरसीला मतदार संघातून निवडणूक लढवत आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी कॉंग्रेस उमेदवाराचा तब्बल 53 हजार मतांना पराभव केला होता. ते म्हणाले की उमेदवाराच्या विरोधातील अथवा सरकारच्या विरोधात नाराजी असल्याचे भासवले जात असले तरी ही नाराजी एका फटक्‍यात दूर करण्याची क्षमता मुख्यमंत्र्यांमध्ये आहे ते हे काम करतील असेही के टी रामाराव यांनी सांगितले.

आमच्या जाहीरनाम्यातील काहीं तृटी काढून आमच्यावर टीका केली जात आहे. पण चंद्रावरही काही डाग असतात. असे डाग शोधून त्यावर टिका करणे हे विरोधकांचे कामच आहे असे ते म्हणाले. आम्ही आमची काही वचने पाळण्यात कमी पडलो हेही त्यांनी मान्य केले. पण आम्ही सक्षम राज्याची पायाभरणी केली आहे असे त्यांनी नमूद केले. आम्ही केलेली चांगली कामे आणि मुख्यमंत्र्यांचे उत्तम प्रशासन या आधारावर ही निवडणुक जिंकू असा दावाही त्यांनी केला. सत्तेसाठी आपल्या परिवारात कोणताही संघर्ष नाही. आपले वडील पुढील दहा पंधरा वर्षे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम पहातील असेही त्यांनी एका प्रश्‍नाच्या उत्तरात सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)