पिंपरी-चिंचवडच्या अप्पर पोलीस आयुक्‍तपदी रामनाथ पोकळे

रानडे यांची अमरावती परीक्षेत्र विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली

पिंपरी – राज्यातील उपमहानिरीक्षक दर्जाच्या तब्बल 20 अधिकाऱ्यांच्या बदल्या व पदोन्नतीचे आदेश निघाले आहेत. त्यानुसार पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातही फेरबदल झाले असून सध्याचे अपर पोलीस आयुक्‍त मकरंद रानडे यांची अमरावती परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून बदली झाली आहे. तर त्यांच्या जागी मुंबई येथील राज्य गुप्त वार्ता विभागाचे उपआयुक्‍त रामनाथ लक्ष्मणराव पोकळे यांची पदोन्नतीद्वारे बदली करण्यात आली आहे. या बदलीचे आदेश आज शुक्रवार दि. 24 मे रोजी शासनाने काढले असून संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने बदलीच्या ठिकाणी हजर राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

राज्य गृहविभागाने शुक्रवारी (दि 24) तब्बल 20 वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. त्यामध्ये काही पोलीस उप महानिरीक्षक अधिकाऱ्यांना विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बढती देण्यात आली आहे तर काही वरिष्ठ पोलीस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांना पोलीस उपमहानिरीक्षक तसेच अप्पर पोलीस आयुक्‍तपदी बढती देण्यात आली आहे. सध्याचे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे अप्पर पोलीस आयुक्‍त मकरंद रानडे यांची विशेष पोलीस महानिरीक्षकपदी पदोन्नती झाली असून त्यांची बदली आता अमरावती परिक्षेत्राच्या विशेष पोलिस महानिरीक्षकपदी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी रामनाथ पोकळे यांची अप्पर पोलीस आयुक्‍त म्हणुन नियुक्‍ती करण्यात आली आहे.

रामनाथ पोकळे यांनी यापूर्वी पुणे ग्रामीण येथे अप्पर पोलीस अधीक्षक तसेच पुणे शहर येथे पोलीस उपायुक्‍त म्हणून काम केले आहे. याशिवाय जालना येथे पोलीस अधीक्षक आणि त्यानंतर राज्य गुप्त वार्ता विभागात उपायुक्‍त म्हणून कर्तव्य बजाविले आहे. जालना, भोकरदनमध्ये कार्यरत असताना पोकळे यांची उल्लेखनीय काम केले होते. भिवंडी येथे कार्यरत असताना ऑईल भेसळ करणाऱ्यांवर त्यांनी कठोर कारवाई करुन तेल माफियांवर मोक्का कायद्यान्वये चाप बसवला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)