पिंपळस ग्रामपंचायतीवर “रामेश्‍वर’चे वर्चस्व

घोगळ प्रथम लोकनियुक्त सरपंच ः जनसेवा मंडळास दोन जागा
ना. विखे समर्थक दोन गट ठाकले होते समोरासमोर

राहाता – पिंपळस गावच्या सरपंचपदी नंदा दत्तात्रय घोगळ यांना प्रथम लोकनियुक्त महिला सरपंच होण्याचा मान मिळाला. त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार सविता सुनील वैजापूरकर यांना 544 मतांनी पराभूत केले. श्री रामेश्‍वर ग्रामविकास जनसेवा पॅनेलने 11 पैकी नऊ जागा जिंकून ग्रामपंचायतीवर वर्चस्व मिळविले.

पिंपळस ग्रामपंचायत निवडणुकीत घोगळ यांच्या श्री रामेश्वर ग्रामविकास जनसेवा मंडळाने 11 पैकी नऊ जागा जिंकून एकहाती सत्ता मिळाली, तर वैजापूरकर गटाच्या रामेश्वर महाराज जनसेवा विकास मंडळाला अवघ्या दोन जागा जिंकता आल्या. ना. राधाकृष्ण विखे पाटील, खा. डॉ. सुजय विखे पाटील यांना मानणारे दोन गट निवडणुकीत समोरासमोर ठाकले होते.

यामध्ये घोगळ गटाला घवघवीत यश मिळाले. सरपंचपदाच्या उमेदवार नंदा दत्तात्रय घोगळ यांना एक हजार 442 मते मिळाली, तर विरोधी गटाच्या सविता वैजापूरकर यांना 898 मते मिळाली. विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते (कंसात) – सोनाली अमोल भोसले (414, विजयी), मीना अशोक वाघमारे (281, पराभूत), सागर भाऊसाहेब कापसे (372, विजयी), प्रताप भाऊसाहेब कापसे (325, पराभूत), दिगंबर विठ्ठल तांबे (419, विजयी), योगेश चांगदेव लोखंडे (277, पराभूत), शोभा प्रमोद कुदळे (306, विजयी), नंदा बाळासाहेब कापसे (148, पराभूत), राणी रघुनाथ जाधव (292, विजयी), विजया अनिल अत्रे (161, पराभूत), अरुण रखमा निरगुडे (270, विजयी), शरद त्र्यंबक कुदळे (188 पराभूत), मनीषा नितीन पुंड (368, विजयी), प्रयागा बाबासाहेब गायकवाड (356, पराभूत), गया मंगेश वाघमारे (417, विजयी), छाया विकास वाघमारे (308, पराभूत), बाळासाहेब त्र्यंबक जगदाळे (368, विजयी), किरण प्रभाकर निमसे (354, पराभूत), आशा राजेंद्र कुदळे (271, विजयी), निशा पोपट कुदळे (183, पराभूत), नितीन अशोक वाघमारे (228, विजयी), विजय अगुस्तीन वाघमारे (188, पराभूत), विशाल यादव वाघमारे (36, पराभूत). बाळासाहेब त्र्यंबक जगदाळे व आशा राजेंद्र कुदळे हे वैजापूर गटाचे दोन उमेदवार विजयी झाले आहेत. ना. राधाकृष्ण विखे पाटील, जि. प. अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील, खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली विकास कामे करू, असे यावेळी नवनिर्वाचित सरपंच घोगळे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)