राम मंदिरासाठी संसदेतच कायदा हवा : रामदेव बाबा 

वारारणी – अयोद्धा येथील वादग्रस्त जमीनीवर राममंदिर उभारणीबाबतच्या प्रकरणावर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाकडून विलंब होत आहे. सध्या यावर न्यायालयाकडून कोणताही मार्ग काढण्याची शक्‍यता नाही. त्यासाठी आता एकच पर्याय उरला आहे. तो म्हणजे राम मंदिराच्या उभारणीसाठी संसदेत कायदा बनवायला हवा, असे मत योगगुरु रामदेव बाबा यांनी व्यक्त केले आहे.

रामदेव बाबा म्हणाले, राम मंदिराबाबत निर्णय यायला सुप्रीम कोर्टाकडून उशीर होत आहे. यावर कोर्टाकडून कोणताही मार्ग दिसत नाही. ही प्रक्रिया वैधानिक आहे. संसदेत कायदा न होता तसेच सुप्रीम कोर्टाने आदेश न देताच जर जनआंदोलनाच्या जोरावर राम मंदिर उभारण्याचा प्रयत्न झाला तर कायदा-सुव्यवस्था बिघडण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे कोणतीही विपरीत घटना टाळताना कोर्टाच्या भरवशावर न राहता संसदेत कायदा व्हावा, असे मत रामदेव बाबा यांनी व्यक्त केले आहे.

-Ads-

रामदेव बाबा यांच्याप्रमाणेच अनेक भाजपा नेत्यांनीही हे प्रकरण कोर्टात असतानाही त्यावर भाष्य करीत यासाठी संसदेत कायदा करण्यात यावा अशी मागणी केली आहे. सुप्रीम कोर्टाचा निर्णय विरोधात जाण्याची शक्‍यताही लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात यावा अशी भुमिका त्यांनी मांडली आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)