रामदास कदम हे मातोश्रीचे पगारी नेते : निलेश राणे

लोकसभेला शिवसेनेच्या 5 जागा सुद्धा येणार नाहीत

कोल्हापूर: स्वाभिमान पक्षाचे नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री यांच्यावर सडकून टीका केली. खासदार संभाजीराजे छत्रपती आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्यामध्ये सुरू असणाऱ्या वादावर बोलताना माजी खासदार निलेश राणे यांनी रामदास कदम यांच्यावर प्रहार केला आहे. पर्यावरण मंत्री रामदास कदम हे मातोश्रीचे पगारी नेते आहेत. त्यांना राणेंवर बोलायचे टार्गेट दिले आहे, असेही ते म्हणाले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

निलेश राणे म्हणाले, रामदास कदम यांनी स्वतः मराठा आरक्षणासाठी काही केले नाही. त्यांना दुसरं काय काम आहे. टपोरी लोक काय म्हणतात त्याचा आम्हाला काही फरक पडत नाही.

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे मराठवाड्यासाठी तुम्ही काय घेऊन गेलात? असा प्रश्न उपस्थित करत ते शेतकऱ्यांसाठी नाही मतांची भीक मागायला गेले आहेत. पण शिवसेनेच्या 5 जागाही लोकसभेला येणार नाही, असा टोलाही लगाविला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या जीवनावरती येणा-या चित्रपटांविषयी निलेश राणे यांना विचारला असता ते म्हणाले, कोणताही चित्रपट पाहताना त्यातील चांगल्या गोष्टी मी नेहमी घेत असतो. कोणताही चित्रपट हा चित्रपट म्हणून बघितला पाहिजे. त्यातल्या वाईट गोष्टी आहेत, त्या दुर्लक्षित केल्या पाहिजेत. त्यामुळे चित्रपट कोणत्या व्यक्ती वरती आहे हे न पाहता चित्रपट हा चित्रपट म्हणून पाहिला पाहिजे, असेही ते म्हणाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)