‘गुजरात’मधून येणाऱ्या प्लॅस्टिकवर कारवाई करणार : रामदास कदम

महापालिका निवडणुक स्वबळावर लढणार

नगर – राज्यामध्ये प्लास्टिक बंदीचा निर्णय घेतल्यानंतर 90 टक्‍के उत्पादन बंद झाले. सध्या गुजरातमध्ये प्लास्टिक तयार होते व त्याची महाराष्ट्रात विक्री होत आहे. ही बाब गंभीर असून या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असून यावर निर्णय झाला नाही तरी पर्यावरण विभागाकडून प्लास्टिकवर कारवाई करणार असल्याची माहिती पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दिली.

-Ads-

नगरमध्ये शिवसेनेच्यावतीने आयोजित कार्यशाळेसाठी ना. कदम नगरला आले असता ते पत्रकारांशी बोलत होते. महाराष्ट्रात प्लास्टिक बंदी झाल्यानंतर आज गुजरात राज्यातून काही प्रमाणामध्ये प्लास्टिक येत आहे. आतापर्यंत काही वाहनांवर कारवाई केली आहे. आतापर्यंत तीनशे गाड्या पकडल्या. गुजरात दीव दमण या ठिकाणचे प्लास्टिक महाराष्ट्रमध्ये आणले जात आहे. तेथील उत्पादकांवर गुन्हे दाखल करण्याची कारवाई सुरू केली असल्याचे ना. कदम यांनी यावेळी सांगितले. प्लास्टिक बंदीचा निर्णय घेणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे.

राज्यात आतापर्यंत प्लास्टिकबंदी नंतर 500 कारखाने बंद झाले आहेत. जे राहिले आहेत ते सुद्धा बंद होतील. पण सध्या रंगीत पिशव्या बाजारामध्ये दिसत आहे, हे अत्यंत घातक आहे. त्यासाठी आता कारवाई मोहिम लवकरच सुरू करणार असल्याचे ते म्हणाले.

यासंदर्भात अधिकाऱ्यांची लवकरच बैठक घेणार आहे. प्लास्टिकला पर्याय म्हणून कापडी पिशव्या आणि साधन तसेच कागद याचा अवलंब केला पाहिजे.प्रत्येकाला मुदत दिलेली आहे. आता यापुढील काळामध्ये मुदत वाढून देणार नाही, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. महाराष्ट्रात प्लास्टिक बंदीचा निर्णय घेतल्यानंतर त्याचे युनोमध्ये स्वागत करण्यात आले. आता युनोने प्लास्टिक बंदीसाठी पावले टाकली आहेत. त्यांनी जी कमिटी स्थापन केले आहे. त्याचे अध्यक्षपदावर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आहेत. त्यामुळे आता त्यांनाही गुजरातच्या प्लास्टिकच्या कारखान्यावर बंदी आणावी, अशी मागणी करणार असल्याचेही कदम म्हणाले.

महापालिका निवडणुकीबाबत बोलतांना ना. कदम म्हणाले की, शिवसेना ही निवडणुक स्वबळावर लढणार आहे. पक्षाची ताकद शहरात वाढली असून शिवसेनेची सत्ता महापालिके येणार असल्याने अन्य कोणाला बरोबर घेण्याची गरज नाही.
यावेळी खासदार सदाशिव लोखंडे, आमदार विजय औटी, शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड, संपर्क प्रमुख भाऊ कोरगावकर यावेळी उपस्थित होते

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)