रामदास कदम यांनी संभाजीराजेची माफी मागावी : सकल मराठा समाजाची मागणी

कोल्हापूर: मराठा आरक्षणाचे श्रेय नारायण राणे यांचे असल्याचे वक्तव्य खासदार संभाजीराजे यांनी केले होते. त्याला प्रत्युत्तर देताना राज्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी कोणाची लाचारी करू नका, असे संभाजी राजे यांना उद्देशून वक्तव्य केले. यावरुन या दोन नेत्यांमध्ये चांगलाच वाद रंगला होता. मात्र, आता या वादामध्ये सकल मराठा समाजाने उडी घेतली आहे. त्यांनी रामदास कदम यांना त्यांच्या वक्तव्याबद्दल जाहीर माफी मागावी, अन्यथा कोल्हापुरात फिरू देणार नाही, असा इशारा दिला आहे. त्यामुळे हा वाद आता आणखीनच चिघळण्याची शक्‍यता आहे.

संभाजी राजे यांचे सचिव योगेश केदार यांनी रामदास कदम यांना फोन करुन जाब विचारला होता. या प्रकारानंतर हा वाद चिघळला आहे. या संभाषणाची ध्वनीफितही व्हायरल झाली होती. छत्रपतींच्या घराण्याबद्दल बोलण्याची रामदास कदम यांची कुवत नाही. त्यामुळे त्यांच्याबद्दल बोलताना आपली आब राखून बोलावे. शिवाय त्यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल जाहीर माफी मागावी. अन्यथा त्यांना कोल्हापुरात फिरू देणार नाही, असा इशारा सकल मराठा समाजाच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेतून देण्यात आला आहे. यावेळी सचिन तोडकर, दिलीप पाटील, राजीव लिंग्रस यांच्यासह सकल मराठा समाजाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)