आम्ही भाजपला महाराष्ट्रात गाडू : रामदास कदम यांचा अमित शहांना ईशारा

मुंबई: महाराष्ट्रात शिवसेनेशी युती झाली नाहीं तर या पक्षाला पटक देंगे असा ईशारा भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी दिला आहे. त्यांच्या इशाऱ्याला चोख प्रत्युत्तर देताना शिवसेनेचे नेते व राज्यातील एक कॅबिनेट मंत्री रामदास कदम यांनी म्हटले आहे की पाच राज्यांतील निवडणूकीत भाजचा दारूण पराभव झाला आहे. त्यांनी आता महाराष्ट्रात येऊन आम्हाला धमक्‍या देऊ नयेत अन्यथा आम्हीही तुम्हाला महाराष्ट्रातच गाडून टाकू असे ते म्हणाले.

मोदींची लाट असतानाही 2014 च्या विधानसभा निवडणुकीत आम्ही स्वबळावर लढून 63 जागा मिळवल्या आहेत हे विसरू नका असा इशाराहीं त्यांनी भाजपला दिला. केंद्रातील मोदी सरकारने आर्थिक मागासासांठी दहा टक्के आरक्षण लागू करण्याचा निर्णय घेतला आहे त्या विषयी विचारले असता ते म्हणाले की आधीच आरक्षणाचे प्रमाण खूप असताना त्यात पुन्हा ते हे आरक्षण कसे देणार आहेत? केवळ निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन घेतलेला हा निर्णय आहे असे ते म्हणाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)