‘भाजप की काँग्रेस’, वाऱ्याची दिशा पाहूनच निर्णय घेणार : रामदास आठवले

मुंबई – रिपल्बिकन पार्टी आॅफ इंडियाचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी एक असं विधान केलं आहे, ज्यामुळं भाजपाची अस्वस्थता वाढू शकते.

‘मी काँग्रेससोबत दहा ते पंधरा वर्षे होतो. आता भारतीय जनता पार्टीसोबतही मला तितकेच किंवा त्यापेक्षा अधिक काळ रहावे लागेल. जोपर्यंत सरकर आहे, तोपर्यंत मी भाजपासोबत आहे. त्यानंतर मात्र हवेचा अंदाज घेऊनच मी निर्णय घेणार, असं सूचक विधान केंद्रीय मंत्री ‘रामदास आठवले’ यांनी केलं आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शुक्रवारी मुंबईत आयोजित कार्यक्रमा दरम्यान त्यांनी हे विधान केलं. रामदास आठवले यांच्या या वक्तव्यानंतर सध्या भाजपासोबत असणारे रामदास आठवले हे आगामी काळात भाजप पक्षाची साथ सोडणार की काय, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

1 COMMENT

  1. Next article
    स्वच्छता कर्मचाऱ्यांवर “डिजीटल वॉच’!
    RELATED ARTICLES

    शिकार प्रकरणी नेमलेली चौकशी समिती फक्त ‘दिखाव्या’साठी : उद्धव ठाकरे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)