रिपाइंसाठी जागा न सोडल्याने आठवलेंनी व्यक्त केली नाराजी

जालना – केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी त्यांच्या पक्षासाठी (रिपाइं-आठवले गट) शिवसेना-भाजप युतीने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जागा न सोडल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. भाजप आणि शिवसेनेत मनोमिलन घडवून आणण्यासाठी मी प्रयत्न केले. मात्र, युतीवर शिक्कामोर्तब झाल्यानंतर दोन्ही पक्षांनी आम्हाला एकही जागा देण्यास नकार दर्शवला, असे आठवले येथे पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

आठवले यांनी मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व शिवसेनेचे राहुल शेवाळे करत आहेत. शिवसेना आणि भाजपने कटूता मागे ठेवत सोमवारी लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटप जाहीर केले. त्यानुसार भाजप 25 तर शिवसेना 23 जागा लढवणार आहे. महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण 48 जागा आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)