राज्यसभेचे आश्वासन दिल्यामुळे माघार घेतली – रामदास आठवले

मुंबई – दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदार संघाच्या उमेदवारी वरून वाद मिटला आहे. या मतदार संघातून शिवसेनेचे राहुल शेवाळे आणि केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी करत रामदास आठवले यांना राज्यसभेचे आश्वासन दिल्यामुळे माघार घेत असल्याची माहिती आठवले यांनी दिली.

दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदार संघातून याआधी रामदास आठवले निवडून आले असल्याने ते आग्रही होते. २०१४ च्या निवडणुकीनंतर माझे आणि मित्र पक्षाचे याबाबत बोलणे देखील झाले होते. त्यामुळे ही जागा मी लढविण्याचे अपेक्षित होते, परंतु माझे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणे झाले असून त्यांनी राज्यसभेचे आश्वासन दिले असल्याचे रामदास आठवलेंनी सांगितले. त्यामुळे आता दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदार संघातून शिवसेनेच्या राहुल शेवाळे यांनी उमेदवारी निश्चित झाली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)