2019 आणि 2020 मधील गांधी जयंती निमित्त डायरेक्टर सिद्धार्थ आनंद यांनी आपल्या चित्रपटाचे बुकींग केले आहे. दोन वर्षांपूर्वी कान्स चित्रपट महोत्सवात त्यांनी आपल्या आगामी “रॅम्बो’ चित्रपटाचे घोषणा केली होती. या चित्रपटात टायगर श्रॉफ मुख्य नायकाची भूमिका साकार आहे. हा चित्रपट पुढील वर्षी 2 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे.
हा चित्रपट सिल्वेस्टर स्टॅलोन याच्या “रॅम्बो’ या क्लासिक चित्रपटाचा हिंदी रीमेक आहे. त्यावेळी टायगरचा फर्स्ट लुकही प्रदर्शित करण्यात आला होता. हा चित्रपट गतवर्षीच प्रदर्शित करण्यात येणार होता. पण निर्माता आणि अभिनेता दोघेही दुस-या प्रॉजेक्टमध्ये व्यस्त असल्याने “रॅम्बो’ला विलंब झाला.
या चित्रपटाचे शूटिंग सप्टेंबर महिन्यात सुरू करण्यात येणार आहे. टायगर नोव्हेंबर-डिसेंबरपासून तयारी सुरु करणार असून नवीन वर्षात भारतासह विदेशात चित्रिकरण करण्यात येणार आहे.
दरम्यान, सिल्वेस्टर स्टॅलोनचा “रॅम्बो’ चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर खूप हिट ठरला होता. या चित्रपटाच्या हिंदी रीमेकमध्ये ऍक्शन हिरो टायगर मुख्य भूमिकेत असल्याने चित्रपटाबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.