निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केल्याने लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजले असून सर्वच राजकीय पक्षांनी लोकसभा निवडणुकांसाठी कंबर कसली आहे. यातच रमझान महिन्याच्या काळातच देशात लोकसभेचे मतदान होत आहे त्यावरून काही राजकीय नेत्यांनी आक्षेप घेणारी विधाने केली आहेत रमझानच्या महिन्यात लोकसभेचे काही ठिकाणी मतदान होणार असल्याने त्याचा मुस्लिम मतदारांच्या मतदानावर विपरीत परिणाम होईल असा आक्षेप काहींनी घेतला आहे. सोशल माध्यमांमध्ये निषेध पूर्ण प्रतिक्रिया दिसून येत आहे. या मुद्द्यांवर बॉलिवूडचे गीतकार – लेखक जावेद अख्तर यांनी ट्विटद्वारे टीका केली आहे.
जावेद अख्तर यांनी ट्विट केले आहे की, “रमजान आणि निवडणुकांबद्दल वादविवाद घृणास्पद आहे, निवडणुकांना रमजानशी जोडणे योग्य नाही, हे धर्मनिरपेक्षतेच्या विरोधात आहे, जे माझ्यासाठी असह्य आहे,निवडणूक आयोगाने रमजान आणि निवडणुकांबद्दल वादविवादवर विचार करू नये.”
I find this whole discussion about Ramzan and elections totally disgusting . This is the kind of distorted and convoluted version of secularism that to me is repulsive , revolting and intolerable . EC shouldn’t consider it for a second .
— Javed Akhtar (@Javedakhtarjadu) March 11, 2019
Kranchi art council had invited. Shabana and me for a two day lit conference about Kaifi Azmi and his poetry . We have cancelled that . In 1965 during the indo Pak war Kaifi saheb had written a poem . “ AUR PHIR KRISHAN NE ARJUN SE KAHA “
— Javed Akhtar (@Javedakhtarjadu) February 15, 2019