रामाला आणि विठ्ठलाला फसवणारे वनगाला सहज फसवू शकतात- जितेंद्र आव्हाड

जे अयोध्येत “रामाला” आणि पंढरपुरात “विठ्ठलाला” फसवू शकतात ते पालघरमध्ये “वनगाला” सहज फसवू शकतात

मुंबई: पालघर लोकसभा मतदारसंघ कोणाला मिळणार, याबाबतचा सस्पेन्स आता संपला आहे. शिवसेनेचे दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणूकीत भाजपाने जिंकलेला पालघरचा मतदारसंघ आता शिवसेनेला मिळाला आहे. मतदारसंघाबरोबरच शिवसेनेने भाजपाचे खासदर राजेंद्र गावीत यांनाही आयात करून त्यांना पालघर मतदारसंघातून उमेदवारी जाहिर केली आहे. मात्र, गावित यांच्याकडून पराभूत झालेले शिवसेनेचे श्रीनिवास वनगा यांना विधिमंडळात पाठविणार असल्याची घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.

जितेंद्र आव्हाड म्हणाले, जे अयोध्येत “रामाला” आणि पंढरपुरात “विठ्ठलाला” फसवू शकतात ते पालघरमध्ये “वनगाला” सहज फसवू शकतात यांच्या दृष्टीने मतदार मूर्ख आहेत.

गावीत यांची उमेदवारी जाहीर करतानाच उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे पालघर पोटनिवडणुकीतील उमेदवार श्रीनिवास वनगा व त्यांच्या कुटुंबीयांची जबाबादारी शिवसेनेची आहे. श्रीनिवास यांच्या इच्छेनुसार त्यांना विधिमंडळात पाठविणार, अशी ग्वाही त्यांनी दिली. एकदा शब्द दिला की तो पाळलाच पाहिजे ही ठाकरे कुटुंबाची आणि शिवसेनेची ओळख आहे. श्रीनिवास वनगा यांनी विधिमंडळात काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यानुसार त्यांना कोणत्याही मार्गाने विविधमंडळात पाठवणारच, असे ठाम आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिले.

https://twitter.com/Awhadspeaks/status/1110577577238892544

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)