विविधा: राम वाईरकर

माधव विद्वांस

फास्टर फेणे फेम व्यंगचित्रकार राम वाईरकर यांचे आज पुण्यस्मरण. त्यांचे निधन 26 फेब्रुवारी 2003 रोजी झाले. त्यांचा जन्म वर्ष 1936 मध्ये झाला. वयाच्या बाराव्या वर्षीच त्यांनी पहिले मोबदला घेऊन कॅलेंडरसाठी चित्र काढले होते. ‘अमर चित्र कथा’ मालिकेच्या अगोदर बालभारतीच्या किशोर मासिक आणि टाइम्स ऑफ इंडियासाठी राजकीय व्यंगचित्रेही काढली होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

वर्ष 1892 अमेरिकेत चिकागो- इंटर- ओशन’ या दैनिकाने कॉमिक्‍स पहिली सुरुवात केली. कथेला चित्रस्वरूप मांडणी करून वाचकांच्या पुढे सादर केले जाऊ लागले . त्यामुळे गोष्टींमध्ये जिवंतपणा येऊ लागला व हा प्रकार अल्पवधीतच लोकप्रिय झाला. नंतर हा प्रकार युरोपमध्येही रूढ झाला. पण भारतात रुजण्यास 70 वर्षाचा काळ लागला. या प्रकाराला भारतात खरी ऊर्जितावस्था अमर कथेच्या माध्यमातून “टिंकल’ने आणली.

त्यासाठी अनेक लेखकांनी व चित्रकारांनी योगदान दिले. राम वाईरकर, दिलीप कदम, सौरेन रॉय, प्रताप मुळीक, वसंत हळबे, प्रदीप साठे सारख्या चित्रकारांनी ही कला विकसित केली. लेखक भा. रा. भागवत यांचा फास्टर फेणे राम वाईरकर यांनी चित्रित केला. राम वाईरकर, प्रताप मुळीक यांच्या ऐतिहासिक-पौराणिक कथांवरील व्यंगपुस्तिका कॉमिक्‍स प्रकारात भारतात लोकप्रिय झाल्या.

महाभारत, श्रीकृष्ण, चाणक्‍य, वर्ष 1969 मध्ये ‘कृष्णा’ आणि नंतर इतर अनेक विषयांवर वाईरकरांनी कथाचित्रे काढली. 1980 च्या दशकात अनंत पै यांनी संपादित केलेल्या “टिंकल’चे ते चित्रकार झाले. चित्रातून कथा सांगायची असल्याने व्यक्‍तिरेखेचे प्रसंगानुरूप चित्र काढणे हीच यातील मुख्य कला आहे. भारतात पौराणिक व काल्पनिक चित्रकथा खूप लोकप्रिय झाल्या. बिरबलावरील चित्रकथा लोकांचे पसंतीस उतरल्या. ते पुस्तकांची मुखपृष्ठेही करीत असत.

राजा मंगळवेढेकरांची ‘बारकू’ ही चित्रकथाही त्यांनीच चित्रित केली होती.पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीदिनी 14 नोव्हेंबर 1971 रोजी 8 ते 14 वर्षे वयोगटांतील मुलांसाठी ‘किशोर’ हे मासिक बालभारतीच्या वतीने सुरू करण्यात आले. यातही वाईरकरांचा सहभाग होता. चाणक्‍य आणि विश्‍वामित्र या चित्रकथांचे काम हे त्यांनी केलेले शेवटचे काम होते. सुपांडी तामिळी कथेवर आधारित खेडेगावातील सामान्य माणसाचे व्यक्‍तिरेखा त्यांनी चित्रकथेतून त्यांचे निधनापर्यंत चित्रीत केल्या. राहिलेले काम त्यांच्या मुलांनी पुढे चालू ठेवले. त्यांची मुलगी अर्चना अंबरकर व मुलगा संजीव हे दोघेही आपल्या वडिलांचा वारसा चालवीत आहेत. त्यांच्या वडिलांच्या कलेचा त्यांना अभिमान आहे. या महान चित्रकथाकारास अभिवादन.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)