‘राम मंदिर नाही तर मत नाही’

पुणे : गत वर्षांपासून राम मंदिराचा मुद्यावर देशातील सर्व पक्षीय नेते आपले मत व्यक्त करतांना दिसून येते आहे, अशात पुणे न्यायालयाच्या भिंतीवर लावण्यात आलेल्या पोस्टर्समुळे सगळ्यांचे लक्ष वेधले  गेले आहे.या पोस्टरमध्ये  पंतप्रधान नरेंद्र मोदींना आवाहन करण्यात आले आहे. तसेच हॅशटॅग #NoMandirNoVote चा वापर करून  २०१९ च्या आधी मंदिर निर्मितीचा कायदा आणा नाहीतर मतं विसरा असे लिहिण्यात आले आहे

दरम्यान,अयोध्येतील वादग्रस्त जागेवर राममंदिर बांधण्याची मागणी करण्यासाठी हे पोस्टर लावण्यात आले आहे. यापूर्वी अयोध्येत राम मंदिर बांधण्याच्या मागणीसाठी अयोध्येत रथयात्रा काढण्यात आली होती. १३ फेब्रुवारी रोजी कारसेवकपुरम सोसायटीने प्रस्तावित राममंदिराबाबत कार्यशाळा आयोजित केली होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)