जनावरांसाठीचा सल्ला पालकमंत्री शिंदेंच्या अंगलट

संग्रहित छायाचित्र

अजब सल्ल्याचे चित्रीकरण समाज माध्यमांवर वेगाने व्हायरल

मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेकडे लक्ष

महापालिकेच्या निवडणुकीच्या भारतीय जनता पक्षाच्या प्रचार सांगता सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या (शुक्रवारी) नगरमध्ये आहेत. त्यातच पालकमंत्री प्रा. शिंदे यांनी हा सल्ला दुष्काळी परिस्थिती शेतकऱ्यांना दिला आहे. पालकमंत्री शिंदे हे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या जवळचे आहेत. शिंदे यांच्या सल्ल्याची फडणवीस कशी दखल घेतात, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

नगर – ‘दुष्काळात जनावरे पाहुण्यांकडे नेऊन सोडा’, असा अजब सल्ला पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी पाथर्डीतील एका शेतकऱ्याला दिला आहे. हा पाहुण्यांचा सल्ला उपरोधात्मक असल्याने पालकमंत्र्यांच्या तो आता अंगलट येऊ लागला आहे.

शेतकऱ्याला दिलेल्या या सल्ल्याचे चित्रीकरण देखील झाले आहे. हे चित्रीकरण समाज माध्यमांवर आज वेगाने व्हायरल झाले असून, पालकमंत्री प्रा. राम शिंदे यामुळे चांगलेच अडचणीत आले आहेत. जिल्ह्यासह राज्यातून विरोधकांनी यावर टिका सुरू केली आहे.

केंद्रीय पथकाकडून जिल्ह्यातील दुष्काळाची पाहणी सुरू आहे. पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी या पथकाचे पाथर्डी येथे स्वागत केले. आमदार मोनिका राजळे यांनीही पालकमंत्र्यांकडे पाथर्डी पालिकेच्या हद्दीतील गावांसाठी दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर जनावरांना चारा छावण्या आणि रोजगार हमी योजनेची कामे सुरू करण्याची मागणी केली आहे.

“राज्य सरकार आणि आपण राज्यासह जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीबाबत गंभीर आहे. उपाययोजना सुरू आहेत. शहरात चारा छावणी करता येत नाही. हे वक्तव्य माझ्या तोंडात घालण्याचा त्यांचा उद्देश आहे. चारा आणि पाण्यापासून कोणत्याही जनावरांना वंचित ठेवले जाणार नाही. ते वक्तव्य जाणीवपूर्वक व्हायरल करण्यात आले आहे.
– प्रा. राम शिंदे,पालकमंत्री

पालकमंत्री शिंदे पाथर्डीत असताना एका शेतकऱ्याने त्यांची भेट घेतली. दुष्काळी स्थितीमुळे चारा उपलब्ध नाही. त्यामुळे जनावरांवर चाऱ्या अभावी उपासमार होत असल्याचे शेतकरी पालकमंत्री शिंदे यांना सांगत होता. पालकमंत्री शिंदे त्यावर म्हणाले, “दुष्काळ पडला आहे, तर जनावरांना पाहुण्यांकडे नेऊन सोडा.’

पालकमंत्री शिंदे यांच्या या अजब सल्ल्याने तिथे बोलणारा शेतकरी आवाक झाला आहे. शिंदे ज्यावेळी शेतकऱ्याला बोलत होते. त्यावेळी ते एका खुर्चीत बसलेले चित्रीकरणात दिसत आहे. वास्ताविक पाहता, पालकमंत्री शिंदे यांनी शेतकऱ्याच्या प्रश्‍नाचे समाधान करायला हवे होते. तसे न होता. पालकमंत्र्यांनी पाहुण्यांचा सल्ला दिला. त्यानंतर ते हसले.

पालकमंत्री शिंदे यांचे हे हसू म्हणजे, आता शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळणारे ठरू लागले आहे. पालकमंक्षी शिंदे यांच्या या अजब सल्ल्याविषयी शेतकऱ्यांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
3 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)