‘खालच्या स्तरावर जावून राजकारण केले नाही’ – ना. राम शिंदे

संग्रहित छायाचित्र

चौंडी ते देवकरवस्ती रस्त्यासाठी 2 कोटी, विविध कामांचे भूमिपूजन

जामखेड – कर्जत-जामखेडला हक्काचे पाणी देण्यासाठी ज्यांनी अडवणूक केली, तेच आज आम्हाला पाणी द्या अशी मागणी करीत आहेत. मात्र, प्रथमतः माझ्या मतदारसंघातील शेतकऱ्यांना पाणी देणार, त्यानंतर त्यांचा विचार नक्की केला जाईल, कारण आपण कधीच खालच्या स्तरावर जावून राजकारण केले नाही. असा विश्वास पालकमंत्री ना. राम शिंदे यांनी दिला.

-Ads-

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून, चौंडी ते देवकरवाडी रस्त्याचे डांबरीकरण व मजबूतीकरणासाठी 2 कोटी मंजूर केले आहेत, अल्पसंख्यांक निधीतून मुस्लिम कब्रस्तान वॉलकंपाउंडसाठी 10 लाख रूपये, तसेच देवकरवस्ती पाणीपुरवठा पाईपलाईनसाठी 9 लाख, सिंगलफेज योजना, ट्रान्सफार्मर या कामाचे भूमिपूजन पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी पंचायत समिती सभापती सुभाष आव्हाड, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गौतम उतेकर, भाजपा तालुकाध्यक्ष रवी सुरवसे, जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ पाचारणे, पंचायत समितीचे सदस्य डॉ. भगवान मुरुमकर, पणन संचालक डॉ. ज्ञानेश्वर झेंडे, देवकरवाडीचे माजी सरपंच अशोक देवकर, बांधखडकचे सरपंच केशव वनवे, बापूराव ढवळे, जातेगावचे सरपंच पांडूरंग गर्जे, युवा नेते प्रशांत शिंदे, खांडवीचे सरपंच गणेश जगताप, चौंडीचे सरपंच अभिमन्यू सोनवने, खर्डा गावचे सरपंच संजय गोपाळघरे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

What is your reaction?
114 :thumbsup:
8 :heart:
0 :joy:
2 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)