डेरा सच्चा सौदा प्रमुख राम रहीमला ‘या’ प्रकरणी मिळाला जामीन

नवी दिल्ली – राम रहीमवर जवळपास 400 माणसांना नपुंसक बनवण्याचा आरोप लावण्यात आला होता. याविरोधात राम रहीमविरोधात कोर्टात केस सुरू आहे. याप्रकरणी आज पंचकूला सीबीआय कोर्टाने डेरा प्रमुख गुरमीत राम रहीम सिंग याला जामीन दिला आहे. दरम्यान राम रहीम सिंग बलात्काराच्या आरोपाखाली 20 वर्षांची शिक्षा भोगत असल्याने त्याला कारागृहातच थांबावे लागणार आहे.

जवळपास 400 माणसांना नपुंसक बनवण्याच्या आरोपप्रकरणी पंचकूलामधील स्थित सीबीआयच्या विशेष कोर्टाने राम रहीम याच्या विरोधात 3 आॅगस्ट 2018 ला आरोप निश्चित केले होते.

-Ads-

मोक्षप्राप्तीखाली केले नपुंसक

गरमीत राम रहीम याच्यावर आरोप आहेत की, साल 2000 मध्ये मोक्षप्राप्तीच्या नावाखाली 400 माणसांना नपुंसक बनवले होते. आरोप असा आहे की, असे केल्याने ही माणसे मुलं जन्माला घालू शकणार नाहीत आणि ते त्याचे निष्ठावन सेवक होतील. दरम्यान मोक्षप्राप्ती न झाल्याने या माणसांनी याबदल 2012 मध्ये तक्रार दाखल केली होती.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)