‘त्या’नंतर राम मंदिराबाबत अध्यादेश !- नरेंद्र मोदी

अध्यादेशाबाबत पंतप्रधान मोदींचे स्पष्टिकरण

नवी दिल्ली: अयोध्येत राम मंदिराच्या उभारणीबाबत अध्यादेश काढण्यासंदर्भातील निर्णय केवळ न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच होऊ शकतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज स्पष्ट केले. “एएनआय’वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी अध्यादेशाबाबतची भूमिका स्पष्ट केली. कॉंग्रेस पक्षाच्या वकिलांकडून सर्वोच्च न्यायालयामध्ये अडथळे आणले जात असल्यामुळेच न्यायालयीन प्रक्रियेला विलंब होत असल्याचे त्यांनी सांगितले.

अत्यंत भावनिक मुद्दा बनलेल्या राम मंदिराच्या उभारणीबाबत हिंदुत्ववादी संघटनांकडून सातत्याने अध्यादेशाची मागणी केली जाऊ लागली आहे. त्याबाबत बोलताना राम मंदिराच्या उभारणीसंदर्भातील तोडगा राज्यघटनेच्या चौकटीच्या आधीन राहूनच काढला जाईल, असे भाजपच्या जाहिरनाम्यामध्येच स्पष्ट करण्यात आले आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)