राम कपूरचा ‘फॅट टू फिट’चा प्रवास

राम कपूरने अनेक हिंदी मालिका आणि चित्रपटात काम केले आहे. ‘स्टुडंट ऑफ द इअर’, ‘एटंज विनोद’, ‘मेरे डॅड की मारुती’, ‘शादी के साईड इफेक्‍ट’ यांसारख्या अनेक चित्रपटात रामनं काम केलं आहे. मात्र, इतर अभिनेत्यांच्या तुलनेत रामचे व्यक्‍तिमत्त्व थोडे वेगळे होते. ‘बडे अच्छे लगते है’, ‘कसम से’ सारख्या अनेक मालिकांमधून लोकप्रिय झालेला छोट्या पडद्यावरील अभिनेता राम कपूरने सध्या आपल्या फिटनेसकडे सर्वाधिक लक्ष द्यायला सुरुवात केली आहे.

रामने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत. त्याने चक्‍क सेल्फीची एक मालिकाच पोस्ट केली आहे. ज्यामध्ये ‘फिट’ राम कपूरला ओळखणे चाहत्यांनाही कठीण झाले. मात्र, रामने आपल्या आरोग्याकडे लक्ष दिलेले स्पष्ट दिसते आहे. त्याने नुसतेच वजन कमी केलेले नाही, तर फिटनेसही सुधारला आहे. त्याच्या चेहऱ्यावर आता आणखी तेज दिसायला लागले आहे.

त्याने या पोस्टमध्ये आपल्या वर्कआऊटची माहितीही दिली आहे. सकाळी उठल्यावर तो तडक जीममध्ये जातो. जीममधील व्यायामापूर्वी तो काहीच खात नाही. जीममध्येही वेट ट्रेनिंग करून भरपूर घाम गाळतो. रात्रीच्यावेळीही भरपूर चालण्याचा व्यायाम तो करतो. आहाराचेही व्यवस्थित नियोजन राम कपूरने केले आहे. तब्बल 16 तास काही न खाण्याचे त्याचे नियोजन आहे. काय खायचे हे जसे त्याने ठरवले आहे, तसेच काय खायचे नाही, हेदेखील त्याने पक्के ठरवून टाकले आहे. त्याची पत्नी गौतमी कपूरनेही आपल्या नवऱ्यातील या बदलाबद्दल खूप आनंद व्यक्‍त केला आहे.

 

View this post on Instagram

 

😘

A post shared by Ram Kapoor (@iamramkapoor) on

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)