राम मंदिरावर आधारित ‘राम जन्मभूमि’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला 

देशभरात सध्या राम मंदिराचा मुद्दा चांगलाच गाजतो आहे. अशात अनेक समस्यांना सामोरे जात राम मंदिरवरील चित्रपट लवकरच चित्रपटगृहात येणार आहे. या चित्रपटास सेन्सर बोर्डने हिरवा कंदील दाखविला आहे. अयोध्या राम मंदिरवर आधारित ‘राम जन्मभूमि’ या चित्रपटास सेन्सर बोर्डचे सर्टिफिकेट मिळाले.

हा चित्रपट २९ मार्चला रिलीज होणार आहे. या चित्रपटाचे लेखक, निर्माता सैय्यद विसिम रिजवी आहे. रिजवी यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले कि, या चित्रपटात राम मंदिराच्या आंदोलनाच्या सर्व घटनाचा समावेश केला आहे.  तसेच चित्रपटाचे चित्रीकरण अयोध्यातील महत्त्वपूर्ण परिसरात करण्यात आले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक सनोज मिश्रा यांनी केले आहे. तसेच मनोज जोशी, गोविंद नामदेव, नाजनीज पाटनी आणि राजवीर सिंह हे या चित्रपट मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

https://youtu.be/LGGVPbrAomo

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)