राष्ट्रीय पोषण आहार जनजागृती रॅली

नगर – देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोषण अभियान सुरू केले आहे.या अंतर्गत पूर्ण सप्टेंबर महिना हा पोषण महिना म्हणून साजरा करत आहेत. आज अहमदनगर येथील पाईपलाईन रोड परिसरात राष्ट्रीय पोषण आहार अंतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प नागरी 2च्या वतीने व साई संघर्ष महिला बचत गट च्या सहकार्याने पोषण जनजागृती रॅली झाली.

ही जनजागृती रॅली संदेश नगर, दसरे नगर,शीला विहार, रेणुका नगर, तपोवन रोड मार्गे संदेश नगर येथील द्वारकामाई मंदिरामध्ये आली व या मंदिरात या रॅलीचा समारोप झाला.या रॅलीमध्ये प्रकल्प अधिकारी सुरेश टेळे,परिवेक्षिका तबसुल शेख, अहमदनगर मधील सर्व अंगणवाडी सेविका,मदतनीस व समाजाचा सहभाग म्हणून साई संघर्ष महिला बचत गट,साई संघर्ष प्रतिष्ठानचे सुनील भाऊ त्र्यम्बके, योगेश पिंपळे, सीमा त्र्यंबके, पुष्पा राऊत, विद्या त्रंबके, निर्मला कुडिया, कमल गायकवाड, कमल कापडे आदी महिला व पुरुष उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

समारोपाच्या शेवटी रॅलीमध्ये सहभागी झालेले सर्वाना साई संघर्ष महिला बचत गट व साई संघर्ष प्रतिष्ठान कडून सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला व कार्यक्रमानंतर सर्वाना भोजन देण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)