#रक्षाबंधन : वृक्षारोपणाचा संदेश देत दादा चौधरी शाळेत रक्षाबंधन साजरे

नगर – भारतीय संस्कृतीत सण, उत्सवाला महत्व आहे. नारळी पोर्णिमा व रक्षाबंधन हे सण सर्वत्र साजरे केले जातात. बहिण भावाला राखी बांधुन हा सण साजरा केला जातो. भावाने बहिणीची रक्षा करावी. दादा चौधरी मराठी शाळेतील विद्यार्थींनीनी वृक्षाला राखी बांधुन झाडे लावा, झाडे जगवा हा सामाजिक संदेश दिला आहे, प्रतिपादन शालेय समिती सदस्या सविता तागडे यांनी केले.

हिंद सेवा मंडळाच्या दादा चौधरी मराठी शाळेत नारळी पोर्णिमा व रक्षाबंधन उत्साहात साजरे करण्यात आला. यावेळी सविता तागडे बोलत होत्या. याप्रसंगी अलकाताई कोठारी, योगिता चंगेडीया, सुप्रिया कोठारी, अश्‍विनी वाळुंजकर,मल्लखांब प्रशिक्षक गणेश वाळुंजकर, मुख्याध्यापक सुभाष येवले, शितल पवार, प्रिया आहिरे, बालवाडी प्रमुख संध्या खिस्ती, वैशाली डफळ, दिलीप परसपाटकी, ज्योती पोकळे आदी उपस्थित होते.याप्रसंगी माजी विद्यार्थी मल्लखांब प्रशिक्षक गणेश वाळुंजकर यांनी शाळेला पंखा भेट दिला .

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

योगिता चंगेडिया यांनी रक्षा बंधनाचा शुभेच्छा सर्व विद्यार्थ्यांना दिल्या. शाळेतील विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्तविक मुख्याध्यापक सुभाष येवले यांनी केले. तर सुत्रसंचालन दिलीप परसपाटकी यांनी केले. आभार ज्योती पोकळे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)