सीताराम सारडा विद्यालयाचा ‘सैनिक हो तुमच्यासाठी…’ उपक्रम

रक्षाबंधना निमित्त विद्यार्थींनींनी जवानांना पाठविल्या राख्या

नगर – हिंद सेवा मंडळाच्या सीताराम सारडा विद्यालयातील विद्यार्थींनींनी कलात्मक आकर्षक आणि नाविन्यपुर्ण राख्या तयार केल्या. या राख्या देशाच्या सीमेवर देशवासीयांचे सरंक्षण करणाऱ्या, सणा-उत्सवाच्या दिवसातही घरापासून दूर असणाऱ्या आपल्या सैनिक बांधवांना पाठविल्या.

-Ads-

नैसर्गिक साहित्यांचा उपयोग करुन पाचशेवर राख्या इयत्ता आठवी, नववी व दहावीच्या विद्यार्थींनींनी तयार केल्या. कापडी फुले, पराग, पाने, चमकदार खडे, रंगित दोरा आदि साहित्य कलात्मकतेने एकत्र गुंफून सुंदर राख्या कलाशिक्षक अशोक डोळसे यांच्या मार्गदर्शनाखाली तयार केल्या. जय हिंद सैनिक सेवा फौंडेशनच्या वतीने शिवाजी पालवे, संभाजी वांढेकर, जगन्नाथ जावळे, भाऊसाहेब करपे, बाळासाहेब नरसाळे, भाऊसाहेब देशमाने, बन्सी दारकुंडे, महादेव शिरसाठ, गौरव ससे व सहकाऱ्यांच्या मदतीने या राख्या सैनिकांना पर्यंत पाठविण्याची व्यवस्था करण्यात आली.

याप्रसंगी विद्यालयाचे समिती अध्यक्ष प्रा.मकरंद खेर यांनी विद्यार्थीनींचे कौतुक करतांना आवड, कृती, आणि संस्कृतीचा सुंदर मिलाफ म्हणजे रक्षाबंधन सण आहे हे सांगुन या राख्या ज्या बांधवा पर्यंत पोहचतील त्यांचा आनंद हाच या विद्यालयाचा संस्कार असेल असे सांगितले. या उपक्रमासाठी विवेक निसळ यांनी आर्थिक सहकार्य केले. विद्यालयाचे मुख्यध्यापक विक्रम सोनवणे यांनी सर्वांचे स्वागत केले. प्रास्तविक व उपक्रमाचा हेतू माहिती कलाशिक्षक अशोक डोळसे यांनी सांगितला. सर्व मान्यवरांचे आभार पर्यवेक्षक मधुकर साबळे यांनी मानले.

लोखंडे अमृता, महेवीश सय्यद, वांशिका परदेशी, पठाण बुशरा, दिपाली उल्हारे, बोरुडे भुमिका, अडागळे वैष्णवी, राजपुत दिया, सानिया बागवान, भोसले धनश्री, चव्हाण संध्या, शेख इरम, साक्षी गायकवाड, आदिती कटके, पुर्वा, पवार, प्रतिमा गायकवाड, साक्षी बिद्रे, साक्षी नराडे, प्रियंका भागवत, रिया साठे, अनिशा सोनवणे आदी विद्यार्थीनी या कार्यशाळेत सहभागी झाल्या होत्या.

प्लॅस्टिक मुक्‍ती हाच मूळ उद्देश

या कार्यशाळेत तयार झालेल्या राख्या विद्यालयातील विद्यार्थ्यांना रक्षाबंधन कार्यक्रमात विद्यार्थीनी बांधतात. हा सांस्कृतिक कलात्मक उपक्रम विद्यालयात गेल्या पंधरावर्षापासून नियमित सुरु आहे. विद्यार्थीनी या कार्यशाळेत नैसर्गिक साहित्यांचा उपयोग करुन शिकलेल्या राख्याच उपयोगात आणतात. प्लास्टिक मुक्तीचा संदेश या उपक्रमाचा मुख्य हेतु असल्याचे सांगण्यात आले. यावेळी मधुकर साबळे, सुशिला नन्नवरे, वैशाली पिसे, लहू घंगाळे, क्रांती मुंदानकर आदिंसह कलात्मक उपक्रमात महिला पालक मोठ्या संख्येने सहभागी होतात.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)