#रक्षाबंधन : पंतप्रधान मोदी यांच्यासह राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींनीही दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली – आज देशभरात रक्षाबंधन हा सण साजरा केला जात आहे. बहिणीने भावाला राखी बांधून सदैव रक्षण करण्याचे वचन घेण्याचा सण. रक्षाबंधनानिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू यांनीसुध्दा राखी बांधून घेतली आणि सर्वांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी म्हटले आहे की, सर्व  देशवासियांना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी लहान मुलींकडून राखी बांधून घेतली. यानिमित्त त्यांनीही सर्व भारतीयांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी म्हटले की, या दिवसाच्या निमित्ताने आपल्यातील बंधुभाव मजबूत बनवूया आणि त्याबरोबरच महिला आणि विशेष करून लहान मुलींची सुरक्षा आणि प्रतिष्ठा जपली जाईल असा समाज तयार करण्याची प्रेरणा घेऊया.

उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी असे म्हटले आहे की, सर्व भारतीयांना आणि सुरक्षा दलातील भारतीय जावनांना शुभेच्छा. मी देवाकडे प्रार्थना करतो की, देशातील नागरिक आणि आपले भारतीय जवान तसेच त्यांच्या परिवारातील लोक सुरक्षित, समृध्द आणि सुखी राहू देत.

https://twitter.com/VPSecretariat/status/1033515705445044226

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)